26 C
Panjim
Tuesday, October 27, 2020

कोलकाताचा चेन्नईन एफसीवर निसटता विजय

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या माजी विजेत्या ऍटलेटिको दी कोलकाताने बुधवारी चेन्नईन एफसीवर एकमेव गोलने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड विल्यम्स याने दुसर्‍या सत्राच्या प्रारंभी केलेला गोल निर्णायक ठरला.
नेहरू स्टेडियमवरील लढतीत चेन्नईनच्या रॅफेल क्रिव्हेलारो, लालीयनझुला छांगटे, आदींनी केलेले उत्तरार्धातील प्रयत्न फसले. एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने आपल्या संघाचे नेट सुरक्षित राखले. एटीकेने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला आहे. त्यांनी एक लढत गमावली. त्यांचे सहा गुण झाले. एटीकेने याबरोबरच आघाडी घेताना जमशेदपूर एफसीला सरस गोलफरकाच्या जोरावर मागे टाकले. एटीकेचा गोलफरक ५ (७-५), तर जमशेदपूरचा ३ (५-२) आहे.

चेन्नईनचा तीन सामन्यांत दुसरा पराभव झाला. त्याहून निराशेची बाब म्हणजे चेन्नईनला अद्याप एकही गोल करता आलेला नाही. मोसमात गोलांचे खाते उघडण्याची प्रतिक्षा असलेला चेन्नईन एकमेव संघ आहे. यामुळे जॉन ग्रेगरी यांच्यासमोरील समस्या घरच्या मैदानावरील पराभवानंतर आणखी वाढल्या आहेत. दुसरीकडे माजी विजेते प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांचे पुनरागमन एटीकेसाठी फलदायी ठरू लागले आहे. उत्तरार्धाच्या प्रारंभी एटीकेने खाते उघडले. ४८व्या मिनिटाला आगुस्टीन इनीग्युएझने ही चाल रचली. त्याने उजवीकडून दिलेला अप्रतिम पास प्रबीर दासने टिपला. पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारत प्रबीरने जेव्हियर हर्नांडेझच्या दिशेने चेंडू मारला. चेन्नईनच्या ल्युचीयन गोएन याने हर्नांडेझला रोखले, पण एटीकेच्या सुदैवाने चेंडू विल्यम्सच्या पायापाशी गेला. मग विल्यम्सने उरलेले काम चोख बजावले.

दुसर्‍याच मिनिटाला एटीकेला मिळालेली फ्री किक जेव्हियर हर्नांडेझने घेतली. त्याने पेनल्टी क्षेत्रात मारलेला चेंडू चेन्नईनच्या धनपाल गणेशने उडी घेत हेडिंग करून गोलरक्षकाकडे सोपविला. पुढच्याच मिनिटाला चेन्नईनला संधी होती. ड्रॅगोस फर्तुलेस्क्यूने उजवीकडून एडविन वॅन्सपॉलला पास दिला. त्या चालीतून नेरीयूस वॅल्सकीसने उडी घेत हेडिंग केले, पण चेंडू बारवरून बाहेर गेला. सातव्या मिनिटाला हर्नांडेझ व रॉय कृष्णाने चाल रचली, पण चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथने ती रोखली. दोन मिनिटांनी चेन्नईनला अप्रतिम संधी मिळाली होती. मध्य क्षेत्रात ल्युचीयनने चेंडूवर ताबा मिळवित रॅफेल क्रीव्हेलारोला पास दिला. डावीकडून रॅफेलने वॅल्सकीसला चेंडू दिला. वॅल्सकीसने मैदानावर घसरत चेंडू नेटच्या दिशेने मारला, पण त्यात अचूकता नव्हती. त्यावेळी फर्तुलेस्क्यू यालाही संधी होती, पण त प्रसंगावधान दाखवू शकला नाही.

एटीकेने १२व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न केला. हर्नांडेझने डावीकडून कॉर्नरवर मारलेला चेंडू विल्यम्स आणि रॉय कृष्णा यांच्या दिशेने गेला. दोघांनी प्रयत्न केला, पण कैथने त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण केला. परिणामी चेंडू ल्युचीयनच्या पायापाशी गेला.
दोन मिनिटांनी वॅल्सकीसने कृष्णाला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यावेळी एटीकेचे पेनल्टी अपील पंच रक्तीम साहा यांनी फेटाळून लावले. १६व्या मिनिटाला अनिरुद्ध थापाने डावीकडून पास दिल्यावर लालीयनझुला छांगटेने मारलेला चेंडू थेट एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याच्या हातात गेला.

२२व्या मिनिटाला चेन्नईनला ढिलाई भोवली असती. ल्युचीयनने कैथच्या दिशेने चेंडू मारला. कैथ पहिल्या प्रयत्नात किक मारताना चुकला. त्यावेळी कृष्णा आणखी जवळ असता तर तो आरामात गोल करू शकला असता. पूर्वार्धात मायकेल सुसैराजने मारलेला चेंडू ल्युचीयनने २४व्या मिनिटाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या अंगाला घासून हाताला लागला. एटीकेने पेनल्टीचे अपील केले, पण ते अमान्य झाले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चला, शक्तीसंपन्न होऊया कोरोनाला हरवुया

योगसाधना - ४७८अंतरंग योग - ६३ डॉ. सीताकांत घाणेकर विसर्जनामागे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक अर्थ म्हणजे...

अतिचंचल बालकांना सांभाळताना…

डॉ. प्रदीप महाजन ३७ आठवड्यांच्या आधी झालेला जन्म, जन्मवेळेचे कमी वजन, गर्भावस्थेत वा नवजात अर्भकाच्या मेंदूला झालेली दुखापत,...

राजकीय आव्हान

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा अन्य कोणाशीही हातमिळवणी न करता आगामी गोवा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश...

आयपीएलवर सट्टेबाजी करणारी आठवी टोळी गोव्यात पकडली

>> हडफडे येथील छाप्यात तिघांना अटक गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने हडफडे - बार्देश येथील ग्रीन व्हिलावर रविवारी रात्री...

ऑक्टोबरमध्ये राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

>> दैनंदिन सरासरी सप्टेंबरमधील १८० वरून ६० वर राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोविड स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असून कोरोना रुग्णांच्या...

ALSO IN THIS SECTION

आयपीएलवर सट्टेबाजी करणारी आठवी टोळी गोव्यात पकडली

>> हडफडे येथील छाप्यात तिघांना अटक गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने हडफडे - बार्देश येथील ग्रीन व्हिलावर रविवारी रात्री...

ऑक्टोबरमध्ये राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

>> दैनंदिन सरासरी सप्टेंबरमधील १८० वरून ६० वर राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोविड स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असून कोरोना रुग्णांच्या...

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची ७ नव्या प्रकल्पांस मान्यता

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सात नव्या उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. काल मंडळाच्या...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही...

बायंगिणी प्रकल्पाला श्रीपाद यांचा आताच विरोध का?

>> कॉंग्रेसचा पत्रकार परिषदेत सवाल केंद्रीय मंंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी बायंगिणी येथील प्रस्तावित कचरा प्रक्रिया...