कोरोना रुग्ण वाढीचा वेग घसरला

0
119

 

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५५३ नवीन रुग्ण आढळले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची देशातील एकूण संख्या १७२६५वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग घसरला आहे. लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवस इतका होता तो आता ७.५ दिवसांवर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्यान, २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५९ जिल्हे हे कोरोनामुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे. देशात सरासरीच्या तुलनेत १८ राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. १९ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीवरून हे समोर आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.