कोरोनासंदर्भात निराधार वृत्त प्रसिद्ध केल्याने गुन्हा दाखल

0
141

 

गोव्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला असल्यासंबंधीचे खोटे व निराधार वृत्त समाजमाध्यमावरून व्हायरल केल्याने सरकारने आपत्ती कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे.

यासंबंधी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, वरील खोट्या माहितीसंबंधी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. आपल्या छायाचित्रासह वॉट्‌सऍपवरून हे वृत्त पसरविण्यात आले असल्याचे विश्‍वजीत राणे यांनी तक्रारीतून नमूद केले आहे. त्या संदेशात राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला असल्याचे म्हटले असून किती रुग्ण बरे झाले त्यासंबंधीचीही खोटी माहिती देण्यात आली असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.