कोरोनाने चोवीस तासांत दोन मृत्यू, ८६ बाधित

0
41

कोरोनामुळे काल राज्यात दोघाजणांचा मृत्यू झाला. तर कोरोनाचा संसर्ग झालेले ८६ नवे रुग्ण राज्यभरात सापडले. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात ८२ रुग्ण रोगमुक्त झाले. त्यामुळे सध्या राज्यात सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ८५६ एवढी झाली आहे. काल केलेल्या ५७२७ रुग्णांच्या चाचणीत ८६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

काल झालेल्या दोन मृत्यूंमुळे राज्यात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२१२ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही २० तर इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची संख्या ही ६ एवढी आहे.
राज्यात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.६७ टक्के एवढे आहे.
कालच्या मृतांमध्ये सावंतवाडी येथील एक ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक तर कुडाळ येथील एका ५३ वर्षीय इसमाचा समावेश आहे. दोघांचाही काल गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७०,५७८ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७४,६४६ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १२,५१,२५५ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१,९७७ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,१९२ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

सर्वांत जास्त रुग्ण काणकोणात
या घडीला सर्वांत जास्त रुग्ण काणकोण तालुक्यात असून ही संख्या ७० एवढी आहे. त्यापाठोपाठ मडगाव येथे ६९, पणजीत ६२, शिवोलीत ५०, कासावली ४०, कांदोळी ३५, चिंबल ३६, खोर्ली व पर्वरी येथे प्रत्येकी ३३, फोंडा ३०, चिंचोणे २९, कुठ्ठाळी २६, कुडतरी व लोटली येथे प्रत्येकी २० असे रुग्ण