कोरोनाच्या फैलावाबाबत पंतप्रधान उद्या साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

0
11

नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या गुरूवारी पंतप्रधान मोदी ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधणार आहेत.
गेल्या काही दिवासंपासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ओमिक्रॉनची बाधा झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळेच वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी हा संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात ओमिक्रॉनसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत ओमिक्रॉनचा प्रसार थांबवण्यावर उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी पर्याय, औषधांच्या उपलब्धतेसह आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांचा आढावा घेण्यात आला होता. याबरोबरच प्राणवायू सिलेंडर, व्हेंटिलेटर, यांचा आढावा घेतला होता.

दैनंदिन रुग्णसंख्येत घट
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक दिवसांच्या सततच्या वाढीनंतर भारतातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात १ लाख ६८ हजार ६३ इतके नवे कोरोनारुग्ण आढळले आहेत. हा आकडा एका दिवसाआधीच्या आकड्यापेक्षा कमी आहे. सोमवारी देशात १ लाख ७९ हजार ७२३ नवे रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. तर, २७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी ५८ लाख ७५ हजार ७९० इतकी झाली असून यामध्ये ४ लाख ८४ हजार २१३ रुग्णांचा मृत्यू आहेत.

देशात ओमिक्रॉनबाधित ४,४६१ रुग्ण
देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४ हजार ४६१ वर पोहोचली आहे. यातील १,७११ रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आमिक्रॉनचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रामध्ये ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकूण रुग्णांची संख्या १२५७ झाली आहे. त्यानंतर राजस्थान ६४५, दिल्ली ५४६, कर्नाटक ४७९, केरळ ३५० आणि उत्तर प्रदेश २७५ आहेत. केरळमध्येदेखील ओमिक्रॉनच्या १७ नवीन प्रकरणांची नोंद झाली असून कोविड-१९ च्या नवीन प्रकाराने संक्रमित लोकांची एकूण संख्या ३४५ वर पोहोचली आहे. हरियाणामध्ये काल ओमिक्रॉन प्रकाराची २६ नवीन प्रकरणे जोडली गेली.