कोरोनाचा पाचवा बळी

0
127

कोरोना व्हायरसमुळे काल शुक्रवारी राजस्थानात उपचार घेत असलेल्या इटालीयन नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे भारत देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे बळींची संखअया ५ वार पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी २०० वर पोहोचली आहे. यापैकी २० रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आणखी चार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. लखनौच्या केजीएमयू रुग्णालयात आता एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू आहे.