30 C
Panjim
Monday, April 19, 2021

कोरोनाचा नवा धुमाकूळ

  • डॉ. सुषमा किर्तनी
    बालरोगतज्ञ

‘कोरोना व्हायरस लस’ हेच या व्हायरसपासून बचाव करण्याचे एकमेव संरक्षक कवच आहे. दोन मात्रांमध्ये ४ ते ८ आठवड्यांच्या अंतराने ही लस आपण घेतली तर फायद्याचे ठरते. पहिल्या मात्रेनंतर २ आठवड्यात आपलं शरीर चांगलाच रोगप्रतिकारक प्रतिसाद देतं आणि दुसरी मात्रा मग आपल्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ घडवून आणते.

कोरोना व्हायरसचे हल्ली अनेक प्रकार जगभर झालेले आढळतात. कोरोना हे नाव कसे पडले हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याच्या अंगावर मुकुटासारखे टोकं असल्याने त्याला कोरोना हे नाव देण्यात आले. मार्च २०२० पासून आपल्या देशात ही रोगराई सगळीकडे पसरली आहे. कोरोनामुळे आपली आर्थिक क्षमता तसेच आरोग्यसुविधा सगळेच ढासळलेले असून कितीतरी लोक त्यामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अनेक डॉक्टर्स या रुग्णांची सेवा करताना आपले आयुष्यच गमावून बसलेयत. पण अजूनही आपल्या देशात कोरोना आटोक्यात आल्याचं कुठेही चिन्ह नाही. परत एकदा कोरोनाची दुसरी डगर आपल्या दारावर थाप देतेय असं वाटतंय. यावेळेला आपल्याला युके स्ट्रेन, ब्राझील स्ट्रेन आणि साऊथ आफ्रिका स्ट्रेन यावर आपली कडक नजर ठेवायचीय.

युके हा प्रगतशील देश आहे. सगळ्या सोयी, चांगल्या आरोग्यसुविधा, उच्चविद्या विभूषित लोक आणि संशोधनाची सामग्री यांनी हा देश सज्ज होता. तर अचानक सप्टेंबर २०२० मध्ये हा व्हेरियंट संशोधकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये एक चतुर्थांश रुग्ण हे नव्या व्हायरसमुळे बाधित झालेले आढळले जे नंतर वाढून डिसेंबर २०२० मध्ये दोन तृतीयांश रुग्ण बाधित झाले. उत्तरेकडील आयर्लंड सोडला तर हा नवीन व्हायरस युकेमध्ये सगळीकडे पसरला. लंडनमध्ये तर तो खूपच जास्त प्रमाणात पसरलाय. तसेच दक्षिणपूर्व आणि पूर्वेकडील इंग्लंडसुद्धा याला अपवाद नाही. इंग्लंडमध्ये ८५३४३ रुग्ण, स्कॉटलँडमध्ये २२५३, वेल्समध्ये ३७१७ आणि उत्तर आयर्लंडमध्ये ३१३ (एकूण ९१६२६ रुग्णांचे निदान करण्यात आले)
बी.१.१.७ हा स्ट्रेन आहे ज्याने हा कहर केला आहे. असं वाटतं की हा स्ट्रेन पहिल्या कोरोना व्हायरस स्ट्रेनपेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूला कारण ठरेल. आफ्रिकेमध्ये दुसरा व्हेरियन्ट आहे- बी १.३५१ आणि त्याच्यामध्ये बी.१.१.७ सारखेच काही बदल झाले असून त्याच्यामुळे अमेरिकेत जानेवारी २०२१च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काही रुग्ण आढळले. ब्राझीलपण नवीन पी.१ स्ट्रेनमुळे ग्रस्त आहे आणि तो ब्राझीलमधून येणार्‍या प्रवाशांमध्ये दिसून आला ज्यांची नियमित तपासणी जपानच्या विमानतळावर करण्यात आली होती.

हा नवीन व्हेरियन्ट खूपच लवकर पसरतो व तरुणांमध्ये जास्त आढळून येतो. त्याची संसर्गक्षमता ७० टक्के आहे. त्यामुळे रुग्ण वाढले तर आरोग्य सेवासुविधांवर ताण येतो आणि त्यामुळे दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच मृत्युंच्या संख्येतही वाढ होताना दिसते. आता आनंदाची फक्त एकच बातमी आहे ती म्हणजे हा नवीन बी.१.१.७ व्हायरस तीव्र संसर्ग करत नाही. पण तो लवकर पसरतो आणि त्यामुळे जास्त प्रमाणात लोक आजारी पडू शकतात. भारतात हा व्हायरस पोचलेला असून जवळजवळ १८७ लोक यामुळे आजारी असल्याचे निदान झाले आहे.

कोविडची लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, तोंडाची चव जाणे, थकवा (दमछाक), वास न येणे ही आहेत. जास्त प्रमाणात रोग वाढला तर श्‍वास घ्यायला त्रास व छातीत न्युमोनियाचा संसर्ग ही त्याची लक्षणे होत. पण या स्ट्रेनमुळे काही नवीन लक्षणे निदर्शनास येत आहेत- जसे थकवा आणि अशक्तपणा, अस्वस्थता (मलेझ), भोवळ येणे, खूपच अंगदुखी आणि स्नायुदुखी. संशोधकांना असे वाटते की नवीन म्युटेशनच्या बदलामुळे व्हायरसच्या प्रजननक्षमतेचा दर वाढलेला आहे आणि तो १.१ पासून १.५ पर्यंत गेला आहे. म्हणजे १ माणूस ज्याला ह्या व्हायरसचा संसर्ग होतो तो आणखी १.५ माणसांमध्ये हा रोग पसरवतो.
यु.के.मध्ये संशोधक सतत शोध लावण्यात मग्न आहेत की हा व्हायरस जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो की नाही? हा व्हायरस कोविडच्या रोगातून बरे झाल्यानंतरही परत त्याच माणसांना संसर्ग करेल की नाही आणि या व्हायरसमुळे कुठला अँटीबॉडी रिस्पॉन्स मिळेल.. याचा शोध सध्या चालू आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तर या व्हायरसची लागण न होण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सांगितल्या आहेत-
१. पीपीई – पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जसे हेल्मेट, कपडे, गॉगल्स इत्यादी. २. हात धुणे व सॅनिटाइझ करणे
३. खोकलताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवणे.
४. तोंड आणि नाक मास्कने झाकणे
५. गर्दी न करणे किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाणे
असा सल्ला दिलेला आहे.
व्हायरस हा नेहमी म्युटेट होत राहतो म्हणजेच बदलत जातो व त्यामुळे सतत त्याच्यावर कडक नजर असणे गरजेचे आहे. आता या व्हायरसवर आपला डोळा का? का याला विचारात घेणे आवश्यक आहे? या प्रश्‍नाचे उत्तर आपल्याला या तीन मुद्यांमधून सापडेल.
१. तो एकदम जलद गतीने दुसर्‍या व्हेरियन्टना जागा देतो आहे.
२. म्युटेशनमुळे व्हायरसच्या रचनेमध्ये बदल होतो आहे.
३. संशोधकांना असे आढळून आले आहे की व्हायरसची संसर्गाची क्षमता कितीतरी पटींनी वाढली आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग खूपच जलद गतीने होतो आहे.
एक म्युटेशन या व्हायरसच्या टोकांच्या महत्त्वाच्या भागाला हानी पोहचवतं. याला ‘रिसेप्टर बाइंडिंग डोमेन’ असे म्हणतात. यामुळे ही व्हायरसची टोकं आपल्या शरीराच्या पेशींना पकडतात व त्यामुळे माणूस या व्हायरसने आजारी पडतो.

डब्लुएचओचे मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरस लस हेच या व्हायरसपासून बचाव करण्याचे एकमेव संरक्षक कवच आहे. दोन मात्रांमध्ये ४ ते ८ आठवड्यांच्या अंतराने ही लस आपण घेतली तर फायद्याचे ठरते. पहिल्या मात्रेनंतर २ आठवड्यात आपलं शरीर चांगलाच रोगप्रतिकारक प्रतिसाद देतं आणि दुसरी मात्रा मग आपल्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ घडवून आणते. या नवीन व्हायरसवर सध्या उपलब्ध असलेल्या सगळ्या प्रमुख कंपन्यांच्या उपलब्ध लसी परिणामकारक आहेत. लस आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला व्हायरसच्या वेगवेगळ्या भागांवर आक्रमण करायला भाग पाडते. त्यामुळे कुठल्याही भागावरची टोकं बदलली तरी त्यावर ती काम करू शकते.

प्रोफेसर रवी गुप्ता (कॅब्रीज विद्यापीठ) यांच्या मतानुसार म्युटेशन वाढल्यामुळे व्हायरसची रोग पसरवण्याची क्षमता (इन्पेक्टिव्हिटी) दुपटीने वाढते. आणि म्हणून तसे म्युटेशन्स जास्त वाढले तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. व्हायरस बदलला की लसीची क्षमता कमी होते असे आता निदर्शनास आले आहे. त्यामुळे व्हायरस जास्त लोकांमध्ये संसर्ग पसरवण्यात यशस्वी होतो. त्यामुळे सध्या व्हायरसच्या बाबतीत जे काय घडतंय ते जास्त गंभीर आहे आणि त्याची नोंद घेणे गरजेचे आहे.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

पौर्णिमा केरकर ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून...