कोने- प्रियोळ येथे रविवारी रात्री कार व स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक दत्ता गोविंद नाईक (55, शेणवीवाडा- शिरोडा) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर फोंडा – म्हार्दोळ रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. रविवारी रात्री म्हार्दोळहून फोंडा येथे कार जात होती. कोने येथे पोहचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटरची धडक कारला बसली. यात स्कूटरचालक दत्ता नाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दत्ता नाईक हे चालक म्हणून काम करीत होते. निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज गावडे यांनी अपघाताचा पंचनामा केला.

