कोकणी अकादमीच्या ‘त्या’ कर्मचार्‍याला सेवेत घेण्याचा आदेश

0
130

गोवा कोंकणी अकादमीतील कंत्राटी तत्वावरील कर्मचारी जानू नाईक यांना ताबडतोब सेवेत रुजू करून घेण्याचा आदेश सरकारने गोवा कोंकणी अकादमीचे अध्यक्ष पुंडलीक नाईक व सचिव शबरी मांजरेकर यांना काल दिला. जानू नाईक गेली दहा वर्षे अकादमीत मजूर म्हणून कामाला होता. त्याच्या नंतर अकादमीत रूजू झालेल्या अन्य तीन कामगारांच्या कंत्राटाचे अकादमीने नूतनीकरण करून जानू याना बेरोजगार केले होते. त्यामुळे जानू याने आपल्या वेतनावर अवलंबून असलेली तीन लहान मुले, पत्नी व आईवर उपासमारीची पाळी आल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देऊन नोकरी देण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सादर केले होते.