कॉंग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ

0
11

>> कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांचे आश्‍वासन

गोव्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास भ्रष्टाचारमुक्त, मजबूत आणि स्थिर सरकार दिले जाणार असून, गोमंतकीयांनी कॉंग्रेसला राज्यात सरकार स्थापन करण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काल पणजीतील पत्रकार परिषदेत केले. आम्ही राज्यात जातीय सलोख्याचे देखील रक्षण करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी शिवकुमार यांनी मोदी सरकारवरही टीका केली. मोदी सरकारने सैनिकांना दिल्या जाणार्‍या लाभांमध्ये कपात केली आहे. संरक्षण क्षेत्रात १,२२,५५५ पदे रिक्त आहेत. मोदी सरकार देशाच्या सुरक्षेशी तडजोड करत आहे. तसेच सरकारने ३० लाख माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शनच्या लाभापासूनही वंचित ठेवले असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केला.