कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची गोव्यात युती व्हावी ः राऊत

0
2

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची गोव्यात युती झाली तर त्या युतीत सहभागी होण्याचा विचार असल्याचे शिवसेनेचे महाराष्ट्रातील खासदार संजय राऊत यांनी काल सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा तसेच कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव, आमदार दिगंबर कामत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची खासदार राऊत यांनी भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. खासदार राऊत हे चार दिवसांच्या गोवा दौर्‍यावर असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांची महाविकाससारखी आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.