Home बातम्या कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीफिस्कटण्याची चिन्हे

कॉंग्रेस राष्ट्रवादी युतीफिस्कटण्याची चिन्हे

0

मिळालेल्या माहितीनुसार उपसभापती माविन गुदिन्हो यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढविण्याची मागणी पूर्वीपासूनच केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही स्वबळावर निवडणूक लढविल्यास अधिक जागा मिळेल, असे केंद्रीय नेत्यांना सांगितल्याचे कळते.

या प्रकारामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. राष्ट्रवादीने युतीसाठी १२ जागांची मागणी केली होती. ती पूर्ण करणे कॉंग्रेसला शक्य नाही. युतीच्या बाबतीत कॉंग्रेस लपवा छपवी करीत असल्याचे दिसून आल्याने प्रदेश राष्ट्रवादीने कार्यकारिणीची बैठक घेऊन कॉंग्रेसने १२ जागा न सोडल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठराव संमत करून चाळीसही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

कॉंग्रेसने राष्ट्रवादीला १२ ऐवजी ८ जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यासाठी आठ पैकी चार जागांवर कॉंग्रेसमन म्हणजे वालांका, युरी आलेमाव यांना उमेदवारी देण्याचा कॉंग्रेसचा प्रस्ताव आहे. ही मागणी पूर्ण व्हावी, असे वाटत असेल तर १२ जागाच दिल्या पाहिजे असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचाही प्रदेश राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना आशीर्वाद नसल्याचे कळते. त्यामुळे या विषयावर कॉंग्रेसच्या गोटात उत्साह आहे.