28 C
Panjim
Monday, September 28, 2020

कॉंग्रेस पक्षाला नेतृत्वाच्या पोकळीचा ङ्गटका

  • ल. त्र्यं. जोशी

खरे तर छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आणि महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपाला सत्तावंचित केल्यानंतर कॉंग्रेसला आपला प्रभाव वाढविण्याची चांगली संधी होती, पण त्यांच्याजवळ परिश्रमी, कल्पक आणि सक्षम नेतृत्वच नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे.

सक्षम नेतृत्वाच्या अभावी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला कसा धक्का बसू शकतो याचे प्रात्यक्षिक गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे धडाडीचे नेते ज्योतिरादित्य शिंदे व २२ आमदारांच्या खुल्या बंडामुळे संपूर्ण देशाला पाहायला मिळाले. या धुमश्चक्रीत त्या पक्षाच्या एका तडङ्गदार नेत्याला तर पक्ष सोडावाच लागलाच, त्याबरोबर पक्षाचे राज्य सरकारही गोत्यात आले आहे. आतापर्यंत असे मानले जात होते की, सोनिया गांधी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पक्षाची घसरण थोपविली जाईल, पण आता ना सोनिया, ना प्रियंका ना अन्य कुणी सावरू शकेल असे म्हणण्याचे धारिष्ट्‌य कुणीही करणार नाही. या नेतृत्वाच्या यादीत मी राहुल गांधी यांचे नाव मुद्दामच समाविष्ट केले नाही, कारण त्या नेतृत्वाची २०१४,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीं मध्ये व दरम्यानच्या बालीश राजकारणामध्ये केव्हाच वासलात लागली आहे.

खरे तर छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आणि महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपाला सत्तावंचित केल्यानंतर कॉंग्रेसला आपला प्रभाव वाढविण्याची चांगली संधी होती, पण त्यांच्याजवळ परिश्रमी, कल्पक आणि सक्षम नेतृत्वच नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. बिचाजया सोनिया गांधींना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. आजारपणाच्या या अवस्थेत त्यांच्यावर हंगामी पक्षाध्यक्षाचे ओझे टाकून एकप्रकारे उर्वरित कॉंग्रेसनेत्यांनी व त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांनी अत्याचारच केला आहे. संपूर्ण पक्ष नाईलाजाने का होईना, पण अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नका असे म्हणत असतानाही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परत घेण्याची चोहीकडून मागणी होत असतानाही त्यांनी आपला बालीश हट्ट सोडला नाही. सव्वाशे वर्षांच्या या पक्षात केवळ घराणेशाहीमुळे नेतृत्वाची स्वस्थ परंपराच प्रस्थापित न झाल्यामुळे अन्य कुणाचे नेतृत्वही समोर येऊ शकले नाही किंवा येऊ देण्यात आले नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर व्याधिग्रस्त सोनियांकडे हंगामी अध्यक्षपद देण्यात आले. पण शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या काही शारिरीक मर्यादा असतात. सोनिया गांधीही त्याला अपवाद असू शकत नाही. शिवाय वार्धक्यानेही त्यांना गाठले आहे. जुने नेतृत्व थकले आहे, नवे नेतृत्व पळपुटे निघाले आहे, अशी आज कॉंग्रेसची अवस्था झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व सक्षम नेत्यांची भक्कम ङ्गळी असलेल्या भाजपाशी त्यांची गाठ पडली. त्याचा परिणाम काय होऊ शकतो हेच संपूर्ण देशाने गेल्या आठवड्यात पाहिले आहे.

नादान नेतृत्वामुळेच कॉंग्रेस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरू शकली नाही. खरे तर लोकसभेतील ५२ हे संख्याबळ प्रभावी विरोधी पक्ष बनण्यासाठी पुरेसे आहे. संपुआचा विचार केला तर ही संख्या ८० पर्यंत सहज जाऊ शकते.

भाजपाविरोधी अन्य पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, तर एक जबरदस्त विरोधी पक्ष लोकसभेत आकार घेऊ शकतो. पण कॉंग्रेसने अधीररंजन चौधरींसारख्या अपरिचित आणि अपरिपक्व नेत्याकडे लोकसभेतील गटनेतेपद दिले. वास्तविक पक्षाचे पुनरुज्जीवनच करायचे असते तर राहुल गांधींनीच पुढे होऊन त्या पदावर काम करण्याची धडाडी प्रकट करायला हवी होती. त्यांनी पळ काढल्यानंतरही शशि थरुर, वीरप्पा मोईली, तिवारी यांच्यासारख नेते लोकसभेत उपलब्ध होते, पण कॉंग्रेसने अधीररंजनसारखे पार्सल त्या जागेवर बसविले. परवा ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या राजीनाम्यांनंतर या विरोधी नेत्याने काय म्हणावे? ‘अब हमारी सरकार बचना मुष्किल दिखता है’, कारण ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ सारखी शब्दावली त्यांच्या कानावर कधी पडलीच नाही. लोकसभेत मुद्दे उपस्थित करण्याच्या बाबतीत तर त्यांच्याकडे अठरा विश्वे दारिद्य्रच आहे. असे नेतृत्व पक्षाला काय दिशा देणार? कार्यकर्त्यांना कसे प्रेरित करणार?
मुळात कॉंग्रेसकडे सक्षम नेतृत्वच राहिलेले नाही. २०१९ पूर्वीचे सोडा, पण त्या निवडणुकीतील पराभवानंतर तर त्याची गाडी जी रुळावरुन घसरली ती रुळावर येण्याऐवजी घसरतच गेली. २०१४ च्या पराभवानंतर त्या पक्षातील कथित ‘थिंकटँक’ने विचार केला की, हिंदू मतदार आपल्यापासून दूर जात आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या लाचार व ढोंगी धर्मनिरपेक्षतेला मात्र दोष दिला नाही. त्याचे खापर भाजपाच्या डोक्यावर ङ्गोडण्याचा प्रयत्न केला. त्या निवडणुकीतील राष्ट्रवादाचा प्रभाव कुणाच्याही लक्षात येण्यासारखा होता. त्याला विरोध करण्यात काहीही अर्थ नाही हे लक्षात यायला हवे होते. विकासाचे मुद्दे घेऊन मुसंडी मारता आली असती. ते काहीच जमले नसते तरी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यायला हवा होता. नव्याने सदस्यनोंदणी, पक्षांतर्गत निवडणुका यासारख्या कार्यक्रमातून नवचैतन्य निर्माण करणे अशक्य नव्हते. हे सगळे कसे करायचे असते याचा वस्तुपाठ भाजपानेच १९८५ च्या पराभवानंतर घालून दिला होता. पण त्यापैकी काहीही कॉंग्रेस नेतृत्वाने केले नाही. तशी क्षमताही त्या पक्षाजवळ नव्हती आणि इच्छाही नव्हती. नेतृत्व आपल्याच गुर्मीत वावरत होते. मोदींवर आरोप करणे एवढा एककलमी कार्यक्रमच त्याने राबविला. ३७० कलम, नागरिकता संशोधन कायदा, एनआरसी यांच्याबाबतीत वास्तववादी भूमिका घेऊन स्वत:ला राष्ट्रवादाच्या प्रवाहात ठेवणे पक्षासाठी अशक्य नव्हते. पण नेमक्या यावेळी त्यांना एकगठ्ठा मुस्लिम मतांची आठवण झाली. ती आपण आपल्याकडे ओढली तर हिंदूंमधील कथित सेक्युलरांच्या मदतीने आपण मोदींचा वारु अडवू शकू असे त्यांना वाटले. डाव्या, बुडत्या कथित इंटलेक्चुअलांना तर काडीचा आधार हवाच होता. त्यांनी डाव साधला. कॉंग्रेसला राष्ट्रीय प्रवाहापासून दूर केले. नागरिकता कायद्याबद्दल हेतूपुरस्सर भ्रम निर्माण करण्यात आला. मुस्लिम समाजाला बेजबाबदारपणे चिथावणी देण्यात आली, पण प्रत्यक्ष हिंसाचार सुरू झाल्यानंतर घरात लपून बसले, कारण त्यांच्या हातात काही उरलेच नव्हते.

या पार्श्वभूमीवर संसदेतील गेल्या आठवड्यातील काकाजाकडे पाहिले तर कॉंग्रेसने विरोधी पक्षात बसण्याचा हक्कही गमावला असेच म्हणावे लागेल. अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पूर्वार्ध तर ते गाजवू शकले, पण दरम्यानच्या काळातल्या हिंसााचारामुळे त्यांना अक्षरश: बचावाच्या पवित्र्यातच नव्हे तर दाती तृण धरून वावरावे लागले.पहिल्या दोन तीन दिवसांत दाखविलेल्या आक्रमकतेचा ङ्गुगा सात सदस्यांच्या उर्वरित सत्रकाळासाठी झालेल्या निलंबनामुळे ङ्गुटला. लोकसभाध्यक्षांची नाराजी, त्यानंतर निलंबन रद्द करण्याचा त्यांचा उदारपणा यामुळे उरलीसुरली हवा गेली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या घणाघाती भाषणामुळे तर दाणादाणच झाली. त्यातच मध्यप्रदेशातील बंडाळीची भर पडली आणि कॉंग्रेसचे नेतृत्व किती दुबळे, कल्पनाशून्य ओ हे साजया जगाने पाहिले. एक दिवसभर तर राहुल गांधी यांच्या तोंडातून शब्दच ङ्गुटत नव्हता. सोनियाजी आजारीच आहेत. प्रियंका कुठे आहेत याचा सुगावाच लागत नाही. अक्षरश: निर्नायकी अवस्था झाली आहे.कमरनाथ, दिग्गीराजा यांचे स्वत:चे भवितव्यच पणाला लागले असल्यामुळे ते हारणारी लढाई लढण्याचा प्रयत्न तेवढा करीत आहेत एवढेच.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...

ALSO IN THIS SECTION

कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी...

कोविड-१९ ला अटकाव करायचा कसा?

अमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही....

चीन संकटात, भारताला संधी

शैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण...

कोरोना आजाराविषयी जाणून घ्या सर्व काही

कोरोना विषाणूच्या आजाराने सध्या जगभरामध्ये दहशत व घबराट निर्माण केली आहे. या आजारावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही....

कार्यकर्त्यांच्या नजरेतून मनोहर पर्रीकर…

स्व. मनोहर पर्रीकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यांच्याविषयी नेहमीच त्यांचे कुटुंबीय, बालमित्र, स्नेही आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून वेळोवेळी भरभरून लिहिले गेले आहे. आम्ही यावेळी...