कॉंग्रेस पक्षाचे सात खासदार निलंबित

0
123

संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल गुरूवारी कॉंग्रेसच्या सात खासदारांना निलंबित केले. लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्या प्रकरणीही या खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. निलंबित केलेल्यांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह या खासदारांचा समावेश आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून चर्चा सुरू असताना कॉंग्रेस नेत्यांकडून गदारोळ सुरू झाला होता.
दरम्यान, कॉंग्रेस खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे सभापतींना कामकाज तहकुब करावे लागले होते.