कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी येत्या बुधवार दि. २ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ गोवा दौर्यावर येणार आहेत. राहुल गांधी निर्धार या कार्यक्रमातून कॉंग्रेस – गोवा फॉरवर्ड आघाडीचे उमेदवार व नागरिकांशी डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या माध्यम प्रमुख अलका लांबा यांनी काल दिली.
राहुल गांधी यांच्या हस्ते कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन केले जाणार आहे. राहुल गांधी राज्यातील पर्यटन व्यावसायिक, तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार आहेत. तसेच, साखळी मतदारसंघात आयोजित केलेल्या प्रचार सभेत सहभागी होणार आहे.