कॉंग्रेस तिकीटावर पणजीतून लढण्यास इच्छुक : फुर्तादो

0
102

पणजी मतदारसंघातील पोटनिवडणूक आपण कॉंग्रेसच्या तिकीटावर लढविण्यास इच्छुक असल्याची घोषणा महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल कॉंग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना केली.गेल्या १९९१ पासून पणजी मतदारसंघात ‘मॅच फिक्सिंग’ चालू आहे. ती पध्दत नष्ट केली पाहिजे, असे सांगून दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी देण्याच्या बाबतीत हिरवा कंदील दाखविल्याचे त्यांनी सांगितले.
फुर्तादो यांनी केलेल्या वरील घोषणेवर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष फालेरो यांची प्रतिक्रीया विचारली असता कॉंग्रेस हा प्रादेशिक पक्ष नव्हे. उमेदवारीसाठी प्रक्रिया असते. फुर्तादो यांच्या इच्छेचा आपण विचार करीत असल्याचे ते म्हणाले.