Home बातम्या कॉंग्रेस खासदाराकडून अण्णांचे विधेयक सादर

कॉंग्रेस खासदाराकडून अण्णांचे विधेयक सादर

0

काल कॉंग्रेसचे उत्तर प्रदेशातील खासदार प्रवीण सिंग अरुण यांनी अण्णांचे जनलोकपाल विधेयक संसदीय समितीला सादर केले. समितीकडे सध्या लोकसभेत सरकारने सादर केलेले लोकपाल विधेयक विचाराधीन आहे.

अण्णांच्या आंदोलनाविरुद्ध यूपीएचा हा एक डावपेच असल्याचे बोलले जात आहे. परवा भाजप खासदार वरुण गांधी यांनी आपण अण्णांचे विधेयक संसदेत मांडणार असे म्हटले होते. यानंतर हे पाऊल कॉंग्रेस खासदाराने उचलले आहे.

कॉंग्रेस कार्यकर्ता म्हणून नव्हे एक नागरिक म्हणून हे विधेयक समितीसमोर सादर केल्याचे अरुण यांनी सांगितले.

अण्णांशी वाटाघाटी करण्यासाठी सरकार केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे व विलासराव देशमुख यांना पुढे करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे.