कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक खासदार शशी थरुर लढवणार

0
11

सध्या कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपण कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे काल जाहीर केले. आपल्याला देशातील बहुतेक राज्यांचा पाठिंबा असल्याचेही थरूर यांनी नमूद केले. केरळातील पलक्कड येथे काल शशी थरूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जेव्हा एखादी व्यक्ती निवडणूक लढत असते, तेव्हा त्याच्यात आत्मविश्वास असायला हवा. मग प्रतिस्पर्धी कोण आहे? याचा काहीही फरक पडत नाही. सर्वांनी बहुमताने निर्णय घ्यायला हवा. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवार असावेत, या मताचा मी आहे, असेही थरूर म्हणाले.