कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत २० उमेदवारांचा समावेश

0
128

कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी २० उमेदवारांच्या नावाची पहिली यादी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल जाहीर केली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठीचे उमेदवार पुढीलप्रमाणे – हरमल – नारायण रेडकर, मोरजी – महेश कोनाडकर, कोलवाळ – सतीश चोडणकर, शिरसई – उमाकांत कुंडईकर, कळंगुट – लॉरेन्स सिल्वेरा, सांताक्रुझ – शिनिय द ओलिव्हेरा, लाटंबार्से – गोविंद मांद्रेकर, पाळी – सूर्यकांत गावडे, होंडा – रमेश गावडे पानशेतकर, नगरगाव – उषा मेस्त.

दक्षिण गोवा – उसगाव गांजे – मुकुंद गावडे, कुर्टी – प्राची नाईक, राय – जोसेफ वाझ, नुवे – ऑस्कुना रॉड्रीगीस, कोलवा – सुझी फर्नांडिस, वेळ्ळी – ज्युलियो फर्नांडिस, बाणावली – रोयला फर्नांडिस, कुडतरी – मिचेल रिबेलो, नावेली – जुझे कोयालो, शेल्डे – हर्षद गावंस देसाई.

कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायतीच्या उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जारी केली जाणार आहे. ज्या मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसतील तेथे समविचारी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.