केरळ हायकोर्टाची बार बंदीला मान्यता

0
118

केरळमध्ये हॉटेलना जोडलेले सुमारे ७०० बार बंद करण्याच्या केरळ सरकारच्या धोरणास केरळ उच्च न्यायालयाने काल मान्यता दिली. २०२३ सालापर्यंत केरळ दारुमुक्त करण्याचा निर्णय कॉंग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने घेतला असून त्याचाच भाग म्हणून वरील धोरण घोषित केले होते. मात्र फोर स्टार व हेरिटेज हॉटेलांतील ३३ बार सुरू ठेवण्यास कोर्टाने मान्यता दिली. केरण सरकारने पंचतारांकित हॉटेलखालील सर्व बार बंद करण्याचा निर्णय घेतला होता.