केरळच्या आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ वक्तव्य चुकीचे ः मुख्यमंत्री

0
107

 

केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती के. के. शैलजा यांनी एका मुलाखतीमध्ये गोव्यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा केरळमध्ये झालेल्या मृत्यूबाबत केलेले वक्तव्य चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केला.
केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती शैलजा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये गोव्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची माहिती देताना गोवा प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्याचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

केरळच्या आरोग्यमंत्र्यांचे हे वक्तव्य धक्कादायक आहे. केरळच्या आयडीएसपी टीमने कोरोनाबाधित म्हणून निश्‍चित केलेला रुग्ण हा गोव्यातील नाही आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे त्या रुग्णाने गोव्यातून प्रवास केलेला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड-१९ हे खास इस्पितळ कार्यरत आहे. या इस्पितळामध्ये उपचार घेतलेले ७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. गोव्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये गोवा आणि गोव्याबाहेरील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गोव्यात वैद्यकीय उपचाराच्या अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील जुने आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणारे इस्पितळ म्हणून परिचित आहे. तसेच गोवा हे स्वतंत्र राज्य असून केंद्रशासित प्रदेश नाही हे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी ध्यानात ठेवावे, असेही सावंत यांनी खुलाशात म्हटले आहे.
केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी कोरोना