Home बातम्या केजरीवालांचे धरणे समाप्त

केजरीवालांचे धरणे समाप्त

0
केजरीवाल यांनी दिल्लीच्या रेल भवन बाहेर आंदोलन सुरू करून दिल्ली पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारित दिले जावेत अशी मागणी केली होती. राजपथावर समर्थकांना आणून रविवारचा गणतंत्र दिन कार्यक्रम उधळून लावण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

सोमवारी पहाटे आंदोलनाला बसलेले केजरीवाल रात्री दिल्लीत रस्त्यावरच झोपले होते. काल सकाळी कारमध्ये त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली. 
मालवीय नगरचे पोलीस अधिकारी, ज्यांनी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या आदेशानंतर वेश्याव्यवसाय चाललेल्या ठिकाणी छापा टाकण्यास नकार दिला व पहाडगंजचे पीसीआर व्हॅन इनचार्ज, जेथे डेन्मार्कच्या महिलेवर बलात्कार झाला, या दोन पोलीस अधिकार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
धरणे मागे घेण्याची विनंती करणारे पत्र दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांना पाठविले होते. दरम्यान, या आंदोलनामुळे दिल्लीत वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच काही मेट्रो रेल्वे स्थानके दोन दिवस बंद ठेवावी लागली.
काल ‘आप’ समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला.