केजरीवालना बजावलेली नोटीस पेडणे पोलिसांकडून मागे

0
7

सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रकरणी आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जारी केलेली नोटीस मागे घेण्याचा निर्णय पेडणे पोलिसांनी घेतला आहे. गेल्या वर्षी गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी आपने प्रचार साहित्य सार्वजनिक मालमत्तेवर लावून ही मालमत्ता विद्रूप केली होत. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी केजरीवाल यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीत केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश दिला होता. आपने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत पेडणे पोलिसांनी नोटीस मागे घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. आपने आपल्या याचिकेत यासंबंधी पोलिसांत नोंद करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे केजरीवाल यांना नोटीस जारी करणे हे अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.