देशात गेल्या एका आठवड्यापासून इंडिगोची विमानसेवा कोलमडलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंडिगोच्या विमान वेळापत्रकात आणि एकूण उड्डाणांमध्ये 10 टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी मंगळवारी हे आदेश दिल्याची माहिती एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत दिली. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले.