25 C
Panjim
Thursday, October 22, 2020

केंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या

>> प्रकाश जावडेकर यांची माहिती

केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या एफएएमई इंडिया योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात ६७० ई बसगाड्यांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात कदंब वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. गोव्याबरोबर महाराष्ट्राला २४०, गुजरातला २५० आणि चंदीगडला ८० इलेक्ट्रिक बसगाड्या मंजूर झाल्या आहेत.

इको फ्रेंडली ई बसगाड्यांमुळे गोव्यातील वाहतूक सुधारणा आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १०० ई बसगाड्या मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला पाहिजे. कदंब महामंडळाला यापुढे इलेक्ट्रिक ई बसगाड्या देण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात वाहनांची वाढत्या संख्येमुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर नागरिकांनी भर द्यावा. राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

लॉकडाऊन संपले पण कोरोना आहे

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी ः सणांच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू अद्याप आहे. त्यामुळे येत्या...

मडगावात सुरक्षा रक्षकाने पाच वाहनांना लावली आग

>> ५ लाखांचे नुकसान, संशयिताला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मुंजविहार घोगळ व मडगाव येथे एका सुरक्षा रक्षकाने पाच चारचाकी...

पोलिसांवर हल्ला केलेल्या दोन्ही संशयितांना अटक

कुर्टी - फोंडा सोमवारी संध्याकाळी फोंड्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे व कॉन्स्टेबल जयवंत भर्तू या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला दोघाजणांनी पळ...

अमली पदार्थप्रकरणी संशयितांस चार दिवसांची पोलीस कोठडी

अमली पदार्थप्रकरणी केरी पेडणे येथील अटक केलेल्या स्थानिक संशयित रामा केरकर, रश्मी केरकर व शिवाजी केरकर यांना काल न्यायालयाने चार दिवसांची पोलीस...

ALSO IN THIS SECTION