केंद्रीय सरकारच्या कर्मचार्यांना ८० टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास आज केंद्रीय मंत्रिमंडळ मान्यता देण्याची शक्यता आहे. याचा लाभ सुमारे ५० लाख कर्मचार्यांना व सुमारे ३० लाख पेन्शनधारकांना मिळेल. सध्या महागाई भत्ता ७२ टक्के मिळतो.
नवी वाढ १ जानेवारीपासून लागू करण्यात येईल. केंद्रीय कर्मचारी संघटनेने महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. ५० टक्केपर्यंत महागाई भत्ता मूळ वेतन श्रेणीत समाविष्ट करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. लवकरात लवकर सातवा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणीही संघटनेचे सचिव के. के. एन. कुट्टी यांनी केली आहे.

