Home बातम्या केंद्रीय कराविरुद्ध सराफी दुकाने बंद

केंद्रीय कराविरुद्ध सराफी दुकाने बंद

0

केंद्रीय अर्थसंकल्पात लेव्ही आयात कर व एक टक्का केंद्रीय अबकारी कर सुवर्णावर लागू केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलर्स ट्रेड फेडरेशनने तीन दिवस दुकाने बंद केली होती. त्या हाकेला ओ देऊन गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने मडगाव येथे ज्वेलरीची दुकाने बंद ठेवली.

सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष विक्रम वेर्लेकर यांनी सांगितले, केंद्र सरकारने सुवर्ण कारागिरांची व व्यापार्‍यांची पिळवणूक केली आहे. अबकारी कर व व्यापारी कर रद्द करण्याची गरज आहे. एक टक्का केंद्रीय अबकारी कर लागू केल्याने सोने महागले व विक्री घटली. त्यासाठी तो कर मागे घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.