केंद्राने अध्यादेशाद्वारे ‘सर्वोच्च’ निर्णय फिरवला

0
10

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला असून, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार स्वतःकडेच ठेवण्यासाठी काल अध्यादेश काढला. केंद्र सरकारने हा अध्यादेश दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार यांना दिला असून, हा केजरीवाल सरकारसाठी मोठी धक्का आहे.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल देताना दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार हे दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय दिला होता.