केंद्र सरकारने राज्य सरकारला 400 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक साहाय्य जारी केले आहे. राज्य सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात राज्यातील 2 खाण पट्टे कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल ही आर्थिक मदत जारी करण्यात आली आहे.
गोवा सरकारने खनिज पट्ट्यांच्या लिलावाची पारदर्शक प्रक्रिया राबवली आणि राज्यातील खाणकामाचे पुनरुज्जीवन आणि ते कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परिणामी राज्यातील खाण क्षेत्राला, रोजगाराला आणि एकूण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, ज्यामुळे शाश्वत आणि जबाबदार विकासाचा मार्ग मोकळा होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी गोवा राज्याला विशेष आर्थिक सहाय्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय खाण मंत्री किसन रेड्डी यांचे आभार मानले आहेत.

