पर्वरी येथील मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पर्वरी येथे काल गोळीबार केला. हॉटेलच्या पार्किंग जागेत हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातून श्रीनिवास नायक थोडक्यात बचावले. पर्वरी पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

