Home बातम्या कॅसिनोंना माझा पाठिंबा : मिस्किता

कॅसिनोंना माझा पाठिंबा : मिस्किता

0

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंना आपला व्यक्तिश: पाठिंबा असल्याचे भाजप प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकारानी कॅसिनोसंबंधी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यानी वरील प्रतिक्रिया दिली.

‘एम्. व्ही. हॉर्स शू’ हा कॅसिनो सुरू झाला आहे हे वृत्त खरे आहे काय, असे पत्रकारानी त्याना विचारले असता आपणाला माहीत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले. मात्र, त्याचबरोबर आपला व्यक्तिश: कॅसिनोंना विरोध नसल्याचे त्यानी स्पष्ट केले. पक्षाच्या भूमिकेसंबंधी बोलताना ते म्हणाले की राज्यात कॅसिनोंना पाठिंबा द्यायचा नाही अशी पक्षाची भूमिका होती. मात्र, सध्या राज्य आर्थिक संकटात सापडलेले असल्याने कॅसिनो बंद करणे शक्य नसल्याचे त्यानी स्पष्ट केले.