Home बातम्या कॅसिनोंतील उलाढालीवर सरकारची नजर

कॅसिनोंतील उलाढालीवर सरकारची नजर

0

 गेल्या आर्थिक वर्षात कॅसिनोंमध्ये सात हजारांहून अधिक संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक गुप्तचर विभागाची कॅसिनोंमधील या मोठ्या उलाढालीवर बारीक नजर असून स्लॉट मशीन आणि इलेक्ट्रॉनिक गेम्सच्या आड काळा पैसा पांढरा कसा केला जातो त्याचा अभ्यासही केला जात आहे.

जी – ७ देशांनी आर्थिक गुन्ह्यांसंदर्भात नियुक्त केलेल्या आर्थिक कृतिदलाच्या अहवालानुसार भारतातील कॅसिनोंपैकी सर्वाधिक कॅसिनो गोव्यात आहेत. गुन्हेगारी जगतातील बड्या असामी आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित संघटना अशा कॅसिनोंमधून पैसा वळवतात असा संशय सरकारला आहे. अशा आर्थिक उलाढालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सरकारी पातळीवर गांभीर्याने विचार सुरू असून येत्या महिन्याभरात राज्यसभेत याबाबत एक विधेयक प्रस्तुत केले जाणार आहे.