कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
8

>> पंजाब लोक कॉंग्रेस पक्षाचेही केले विलिनीकरण

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक कॉंग्रेसचे प्रमुख कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. यासह त्यांनी आपला पक्ष पंजाब लोक कॉंग्रेस (पीएलसी) हा देखील भाजपमध्ये विलीन केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर आणि किरेन रिजिजू उपस्थित होते.

अमरिंदर सिंह यांच्यासोबत कॉंग्रेसचे माजी नेते आणि पंजाब विधानसभेचे माजी उपसभापती अजय सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबमधील सुनील जाखर, बलबीर सिद्धू, राजकुमार वेरका, राणा गुरमीत सोधी, फतेह जंगसिंग बाजवा, गुरप्रीत सिंग कांगार, सुंदर शाम अरोरा, केवल ढिल्लन यांसारख्या कॉंग्रेसमधील कॅप्टनच्या साथीदारांपैकी अनेक नेते आधीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

पीएलसीचे भाजपमध्ये विलिनीकरण झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल. भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे, असे नरेंद्र तोमर म्हणाले.