राज्य सरकारने कृषी धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा कालावधी आणखी 4 महिन्यांनी वाढविला आहे. या कृषी धोरण समितीमध्ये माजी कृषी मंत्री तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट आणि अन्य 4 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासंबंधीची सूचना कृषी खात्याचे संचालक नेव्हील आल्फान्सो यांनी जारी केली असून, या समितीचा कालावधी येत्या 31 मार्च 2024 पर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्याचे कृषी धोरण तयार करण्यासाठी कृषीमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 33 जणांचा समावेश असलेल्या एका समितीची निवड करण्यात आलेली आहे. आता, या समितीमध्ये आणखी 6 जणांची भर घालण्यात आली असून, समितीच्या एकूण सदस्यांची संख्या 39 एवढी झाली आहे.
या समितीमध्ये आमदार विजय सरदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याबरोबर केरी-सत्तरी येथील विश्वासराव राणे, रिवण-सांगे येथील पांडुरंग पाटील, वेळसाव येथील रोकोझिन्हो डिसोझा, चिंचिणी येथील आग्नेल फुर्तादो यांचा समावेश करण्यात आला आहे.