– डॉ. अरुण हेबळेकर
मगळाला संस्कृतमध्ये ‘कुज’ म्हणतात. हा एक लालसर ग्रह. कुतूहलजनक असा. ङ्गलज्योतिष शास्त्रात त्याच्या रंगावरून असावं, तो एक भयप्रद ग्रह मानला जातो. मुलींच्या नशिबात तर तो ङ्गारच अपशकुनी मानला गेलाय. आधुनिक युगातील पाश्चात्त्य विज्ञान–ललित चित्रपटांत त्याला अतिशय दुष्ट अशा जीवनमानाला थारा देणारा समजला गेलाय. वॉर ऑङ्ग द वर्ल्डस्, स्पिशीज, स्पिशीज– २ वगैरे चित्रपटांमध्ये मंगळावरील प्राणी पृथ्वीवर येऊन (तेही ङ्गक्त अमेरिकेत! सर्वच पृथ्वीबाह्य प्राण्यांना केवळ अमेरिकेतच उतरावंसं वाटतं, का ते कळत नाही.) आपली पिढी वाढवू पाहतात असं दाखवलं गेलंय. आणि कित्येकांचा त्यावर विश्वास बसतो. परंतु असलीयत काय आहे?
मंगळ हा आपल्या सूर्यमालेतील सूर्यापासूनचा चौथा ग्रह. आपल्याकडे त्याला मंगळ अथवा कुज म्हणतात. रोमन लोकांनी याला मार्स हे त्यांच्या युद्धदेवतेचं नाव दिलंय. कदाचित त्याच्या लाल रंगामुळे असावं. तेच नाव आता टिकलेलं आहे. त्याचं आकर्षण सदा–सर्वकाळ मानवाला राहिलेलं आहे. त्याला आपण अमंगलच मानलंय. बुध ग्रहाएवढा असलेला हा ग्रह पृथ्वीपेक्षा लहान असून त्याचा व्यास जवळजवळ अर्धा आणि आकार पृथ्वीच्या १५ टक्के आहे. वस्तुमान ११ टक्के असून त्यावरील गुरुत्व पृथ्वीच्या जवळजवळ अर्धं आहे. मंगळाचं वर्ष पृथ्वीच्या १.८८ वर्षांएवढं आहे. मंगळाचा दिवस पृथ्वीच्या २.२ वर्षांएवढा आहे. यालाही पृथ्वीसारखा इंग्रजीत टेरेस्ट्रीयल ग्रह म्हटलं जातं. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना कधीकधी टेरेस्ट्रीयल म्हणजेच पृथ्वीसमान आणि इन्नर प्लॅनेट्स (लघुग्रहांच्या कक्षेच्या आतील, आंतर्ग्रह) असंही म्हटलं जातं. हे ग्रह एक कठीण अशी भूरचना असलेले ग्रह आहेत. त्याउलट गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून हे गॅस जायंट्स, म्हणजेच वायुरूपी राक्षस, बाह्य ग्रह आहेत जे लघुग्रहांच्या कक्षेबाहेरील कक्षांमध्ये मोडतात.
मंगळ या ग्रहाचा शोध घ्यायला चक्क विसाव्या शतकाच्या पहिल्या चार दशकांतूनच सुरुवात झालीय. आधी काहींना दुर्बिणीतून पाहताना मंगळावरील ‘कालव्यां’चा शोध लागला. त्यानंतर दुर्बिणीतून पाहतानाच शोध लागला तो मंगळाच्या ध्रुवप्रदेशातील ‘बर्ङ्गा’चा. या दोन्ही शोधांवरून मंगळावर पाणी आणि म्हणूनच जीवनमान असू शकण्याचा कयास केला गेलाय. काही खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील जीवनमान आधी मंगळावर जन्मून तो ग्रह राहण्यासाठी अयोग्य होताच पृथ्वीवर उतरल्याचं अनुमान करायलादेखील मागेपुढे पाहिलं नाही. अजूनही तिथं जीवनमान असल्याची शक्यता नाकारली जात नाही. खरं काय आहे हे सर्वांना जाणून घ्यायचंय.
त्यातील पहिला प्रत्यक्ष प्रयत्न १९६५ मध्ये मरीनर– ४ हे अंतराळ यान मंगळाजवळून पाठवून करण्यात आला. त्यानंतर मंगळावर काही यानंही उतरवण्याचे प्रयत्न झाले. त्यात रशिया आणि अमेरिका सर्वात पुढं आहेत. काही यानं यशस्वीपणे उतरवण्यात आली. त्यांनी बरीचशी माहिती मिळवून पाठवली. उदाहरणार्थ, मंगळावरील मातीत बर्ङ्गाचे अंश सापडले. काही पाण्याचे अंशही सापडले. तरीही एक स्पष्ट झालं. मंगळावर जीवनमान असलंच तरी पृथ्वीवरील जीवनमानासारखं अजिबात असू शकत नाही. तरीही शोध संपलेला नाहीय. आजच्या घटकेला मंगळाभोवती तीन यानं घिरट्या घालत आहेत. माहिती मिळवत आहेत आणि पृथ्वीवर पुरवीत आहेत. परंतु काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी अधिक सक्षम यंत्रे आणि उपकरणे हवी आहेत. आणि ती मंगळावर उतरवायला हवीत.
आतापर्यंत मिळालेली माहिती काही उदाहरणादाखल द्यायची झाली तर आपल्याला माहीत असलेल्या जीवनाला पोषक मुळीच नाही असेच म्हणावे लागेल. हां, मंगळावर वातावरण आहे. त्याच्यावर पृथ्वीवर होतात तसे ऋतू असावेत असेही वाटते. कारण ऋतूंसाठी योग्य असा मंगळाचा स्वत:भोवतीच्या ङ्गिरण्याचा आस त्याच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणाच्या कक्षेच्या आसाशी सुमारे २५ अंशाचा कोन करतो. त्यावरील तापमान ८७ अंश सेल्सिअस आणि २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान बदलतं. त्याचा लाल रंग त्यावरील आयर्न ऑक्साइडमुळे असून त्यात सिलिकॉन आणि खडक म्हणण्यायोग्य असे सर्व घटक आहेत. मंगळाचं वर्ष आपल्या वर्षाच्या जवळजवळ दुप्पट मोठं आहे. (आणि दिवसही आपल्या वर्षाच्या दुप्पट मोठा आहे!) परंतु हे एक कारण जीवनमानाला तग धरून राहायला पुरेसं आहे असे म्हणता येणार नाही. मंगळाच्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण खूपच कमी आहे. ०.१३ टक्के एवढंच. सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे. ९५ टक्के एवढं. मंगळावरील वातावरणात क्रिप्टॉन, आर्गन, निऑन, झिनॉन हे इतर मूलतत्त्वांशी मीलन न करू शकणारे इनर्ट वायूही आहेत. त्याशिवाय मिथेन, हायड्रोजन पेरोक्साईड, नायट्रोजन ऑक्साइड वायूही आहेत. एकंदर आपल्याला ओळख असलेल्या जीवनमानाची शक्यता त्यामुळे कमीच वाटते.
प्रश्न असा आहे की मंगळावर खरोखर पाणी आहे का? आणि असलंच तर किती प्रमाणात आहे? मोठे असे साठे आणि तेही मोठ्या कालावधींचे होते का लहान प्रमाणातील काही काळच टिकू शकलेले असे होते? त्यावरून एक अंदाज लागू शकतो. मंगळावर आज नसलं तरी कधीकाळी जीवनमान होतं का? त्याचे काही पुरावे मिळू शकतात का? मंगळावरील आधी दिसलेले कालवे हे कालवे नसून पृथ्वीवर जसे भूपटल होते तशा भूपटलांच्या हलण्यामुळे तयार झालेल्या त्या भेगा असायची अधिक शक्यता आहे. ती शक्यता, का ते एक सत्य आहे याचाही शोध घ्यायचा आहे. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया अजून समजलेली नाहीय. मंगळावरील या पटलांच्या अभ्यासातून ग्रहनिर्मितीच्या प्रक्रियेवर काही प्रकाश पडायची शक्यता आहे. मंगळावरील लोहजन्य खडकांच्या अस्तित्वाचं कारण ग्रहनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळात त्यावर पडलेल्या सौरजन्य आण्विक किरणांच्या दाबाच्या प्रखरतेत असावं असं मानलं जातं. कदाचित मंगळाच्या एकंदर रचनेवरून त्यावरील सत्यासत्याचा पडताळा होईल असंही वाटतंय. एकंदर मंगळाच्या अभ्यासावरून पृथ्वीवर राहून मानवानं मिळवलेल्या ज्ञानात भर पडू शकते (एक से दो भले या न्यायाने) असा एक अंदाज आहे. आणि नासाला (नॅशनल एअरॉनॉटिक ऍण्ड स्पेस एजन्सी, अमेरिकेतील संयुक्त राज्यं) त्याचं महत्त्व वाटल्यानं त्यांनी एक मोहीम आखली.
एकंदर अडीच हजार अब्ज डॉलर्सच्या या मोहिमेत एक यान मंगळावर उतरवलं जात आहे. २६ नोव्हेंबर २०११ ला निघालेले हे यान सोमवार ६ ऑगस्ट २०१२ या दिवशी भारतीय समयानुसार सकाळी दहाच्या सुमारास मंगळावर उतरणार आहे. उतरताना किंचित त्रास (टेरर पिरियड) व्हायची शक्यता काही गोटातून वर्तवली गेलीय. परंतु आतापर्यंत सारं व्यवस्थित चाललंय असा दावा आहे. यान उतरवण्याचे सारे पूर्वसोपस्कार ३० जुलैला संपले असून या पुढलं सारं कार्य ऑटोनॉमस म्हणजे स्वयं–आधारावर चालणार आहे असं म्हटलं गेलंय.
एखाद्या मोटर गाडीसारखं असलेल्या या यानाचं नाव मार्स सायन्स लॅबोरेटरी असं आहे. त्याला मार्स क्युरीयॉसिटी रोव्हर– मंगळ कुतूहल भटक्या यान– असंही म्हटलं गेलंय. एकंदर सुमारे एक टन वा ठीक ९९० किलोग्रॅम (एक टन म्हणजे १००० किलोग्रॅम ) वजनाचं हे स्वयंचलित यान मंगळावरील गेट क्रेटरमधील माऊंट शार्प नावाच्या पर्वताजवळ उतरवलं जाणार आहे. ते सुमारे दोन वर्षे ङ्गिरत, कार्यरत राहून माहिती मिळवणार आहे आणि पृथ्वीवर पाठवणार आहे. मिळवल्या गेलेल्या माहितीची छाननी करून त्याचं विश्लेषण करायच्या कार्यात नासाच्या शास्त्रज्ञांच्या व्यतिरिक्त डॉक्टर जॉन ब्रिजेस हे ग्रेट ब्रिटनमधील लैस्टर विद्यापीठातील मंगळ अभ्यासक आणि ङ्ग्रान्सच्या राष्ट्रीय विज्ञान अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ या अभ्यासात सहभाग घेणार आहेत असं बीबीसीचं वृत्त आहे. प्रामुख्याने या यानानं मिळवलेल्या माहितीवरून या तीन प्रश्नांची खात्रीलायक उत्तरं मिळू शकतील अशी डॉक्टर ब्रिजेस यांना आशा आहे. या यानात अद्ययावत आणि अधिक सक्षम उपकरणं असल्यामुळं ङ्गारच उपयुक्त माहिती मिळू शकणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
सोमवारी आपण बहुतांश लोक जेव्हा आदल्या रविवारचा आळस टाकून देऊन आपापल्या कचेरीत कामाला जुंपायचा प्रयत्न करत असू तेव्हा हे कु.ज. यान मंगळावर उतरलेलं असेल. त्याच्या कामाचं अवलोकन करणारी मंडळी काय माहिती मिळवेल त्यानं एखाद्या कुंडलीत मंगळ असलेल्या मुलीच्या जीवनावर काही परिणाम होवो वा न होवो, आपल्या मंगळावरील माहितीत भर पडेल यात शंका नाही.