कुडचड्यात क्वॉरंटाईन व्यक्तीकडून फळविक्री

0
115

बाणसाय-कुडचडे येथील शरीफ बिल्डिंग मध्ये क्वॉरंटाईन शिक्का मारलेली व्यक्ती फळे विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने कुडचडेत खळबळ माजली आहे. खरी परिस्थिती समजून आल्याशिवाय फळे खरेदी केलेल्याना समाधान वाटणार नाही तो पर्यंत त्यांना वैद्यकीय अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मूळ कर्नाटक येथील अल्ताफ खेळगाले हा कुडचडे बाजारात फळ विक्री करीत असे. आता राज्यात लॉकडाऊन झाल्याने भाजीप्रमाणे फळेही मिळेनासी झाल्याने अल्ताफ खेळगाळे हा कर्नाटकात जाऊन कुडचडे शहरात विक्रीसाठी कलिंगड, द्राक्षे व अन्य फळे घेऊन आला. येत असताना त्याला गोवा राज्याच्या चेकनाक्यावर क्वॉरंटाईन शिक्का मारून पाठविला. पण तो विविध फळांची विक्री करू लागला.

भाजी, फळे शोधणार्‍या एका गिर्‍हाईकने त्याच्या हातावर क्वॉरंटाईन केलेला शिक्का पहिला अन् एकच गोंधळ उडाला. लागलीच कुडचडे पोलिसांना पाचारण करण्यात आले असता पोलिसांनी कुडचडे काकोडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरना बोलावून घेऊन फळ विक्रेत्या अल्ताफसहित त्यांच्या इतर कुटुंबातील सर्वांना आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली व क्वॉरंटाईन अहवाल मिळेपर्यंत घरातच राहण्याची ताकीद दिली.