कुटुंबातील चौघांचा तिळारी नदीत बुडून अंत

0
71
एकाच कुटुंबातील एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान चौघे वगळता दुसर्‍या एकाला वाचवण्यात यश आले. वडलांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दोडामार्गात हळहळ व्यक्त होत आहे.
काल संध्याकाळी साडे सहा वाजताची ही घटना घडली. काळोख पडल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेहांचा शोध घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे शोध मोहीम आज शुक्रवारी सकाळी राबवण्यात येणार आहे.

हे कुटुंब मूळ परमे गावातील रहिवाशी असलेले व गेली अनेक वर्षे उसगाव-फोंडा गोवा येथे हॉटेल व्यवसायानिमित्त राहते. परमे देऊळवाडी येथे घराचे काम सुरू असल्याने चार दिवसांपूर्वीच अर्जुन वासुदेव आरोस्कर हे आपल्या कुटुंबासह तसेच भाचा-भाची यांना घेऊन परमे येथे मूळ गावी आले होते.
गुरुवारी २९ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अर्जुन वासुदेव आरोस्कर, त्यांची मुलगी अरुण आरोस्कर (२१), मुलगा आकाश आरोस्कर (१८), अक्षय आरोस्कर (१७) भाचा, अंकित अंकुश गवस (१८), भाची अक्षता अंकुश गवस असे सर्वजण परमे येथे तिळारी नदीत हत्तीचो गुणो येथे आंघोळीसाठी गेले असता आंघोळ करून नदीपात्रातून परतताना अर्जुन आरोस्कर हे वर आले तर त्यांची मुले व भाचा-भाची वर येत असताना त्यांचा तोल गेल्याने खोल पाण्यात पडली व सर्वजण एकमेकांच्या हातात हात घालून असल्याने पाण्यात बुडाली. त्यातील अंकिता अंकुश गवस ही भाची पाण्याच्यावर आल्याने बांबूचा आधार देऊन अर्जुन यांनी तिला वर काढले. आकाश, अक्षय, अक्षता या तीन भावंडाचा तसेच भाचा अंकित याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान अक्षता ही गोवा येथे द्वितीय वर्षात सीए करीत होती तर आकाश आणि अंकिता दोघेही १२ वी पव अक्षय हा १० वी परीक्षा उत्तीर्ण झाला होता.