चोडण येथील फेरीधक्क्यावर फेरीबोट बुडाल्याची घटना ताजी असताना काल टोल्टो – धावजी या जलमार्गावरील एक फेरीबोट कुंभारजुवा नदीच्या पात्रात बंद पडली. बार्जच्या कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. नदीच्या पात्रात बंद पडलेली फेरीबोट पाहून समोरून आलेल्या बार्जच्या कॅप्टनने तारेवरची कसरत करून आपली बार्ज एकदम बाजूला नेल्याने बार्जला फेरीबोटीचा धक्का लागला नाही.

