कुंभारखण येथे मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ महिलेचा खूनच झाल्याचे काल शवचिकित्सा अहवालात निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिच्या डोक्याला जबर मारहाण झाली असून तिच्या डोक्यावर प्रथम जड वस्तू घालून तिला आधी मारण्यात आले व नंतर ती मेल्याची खात्री करून तिचे कपडे काढून मग तिचा मृतदेह झाडाझुडपात आणून टाकला असावा. महिलेविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही. महिलेचा चेहरा ओळण्यापलीकडे होता. वाळपई पोलिसांनी ज्या जागी मृतदेह सापडला त्याठिकाणाहून आजूबाजूच्या जंगलात तपास केला. वाळपई पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही बेपत्ता महिलेविषयी माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी. माहिती खालील दूरध्वनीवर द्यावी – वाळपई पोलीस स्थानक ०८३२-२३७४२५५ व ७८७५७५६००० किंवा ७८७५७५६०३२, ३३, ३४.

