कुंडईतील स्वयंअपघातात युवक जागीच ठार

0
136

कुंडई येथील सर्कलजवळील रस्त्यावर दुचाकीवरून पडून कुंडईतील युवक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. अपघात ठार झालेल्या युवकाचे नाव साईश प्रकाश कुंडईकर (वय २१) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईश प्रकाश कुंडईकर हा जीए-०५ के-२३२७ या क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंड्याहून कुंडईच्या दिशेने घरी परतत होता. रस्त्यावरील खड्‌ड्याचा अंदाज न आल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याचे डोके रस्त्यावर आदळले. डोक्याला हेल्मेट घातले नसल्याने गंभीर ईजा होऊन साईश कुंडईकर रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाला. साईश कुंडईकर हा फॅब्रिकेशनचे काम करीत होता. या प्रकरणाचा तपास फोंडा पोलीस करीत आहेत.