Home बातम्या कुंकळ्ळी व बेताळभाटी येथे घरफोडी

कुंकळ्ळी व बेताळभाटी येथे घरफोडी

0

कुंकळ्ळी येथे प्रिया देसाई यांचे घर फोडून ६० हजार रुपयाचा ऐवज पळविला. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत राहणार्‍या प्रिया देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे की चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व सोन्याचा निकलेस व दोन अंगठ्या, कर्णफुले पळविली.

बेतलभाटी येथील इमेरिको मार्टिस यांचे घर फोडून ६१ हजार रुपयांचा ऐवज पळविला अशी तक्रार कोलवा पोलीस स्टेशनवर नोंदविली आहे. चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरांत प्रवेश केला व कपाटांतील सोन्याच्या बांगड्या, तसेच एक हजार रुपये रोख पळविले.