30 C
Panjim
Monday, April 19, 2021

किशोरवयीनांशी कसे बोलावे?

  • डॉ. सुषमा किर्तनी
    (बाल, नवजात, किशोरवयीन रोगतज्ज्ञ)

‘जागतिक किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य आठवडा’ हा २१ मार्च ते २७ मार्च असा पाळण्यात आला. त्यानिमित्त किशोरवयीन मुले आणि पालक यांच्यातील संवाद कसा टिकवता येईल याविषयी थोडेसे….

आपल्या पाल्यांशी किंवा मुलांशी दिलखुलास बोलणे हे प्रत्येक आईवडलांचे कर्तव्यच आहे, मग पाल्य लहान असो किंवा किशोरवयीन! सगळ्यांनाच हे करणे शक्य असते असे नाही. खूपशा पालकांना हे बिलकुल ठाऊक नसतं किंवा वेळ नसतो अथवा जमत नाही. यामुळे मुलं बिघडतात. त्यांना मार्गदर्शन करणारे, समजून घेणारे कुणी नाही असं वाटतं व ती भटकतात. किशोर वयात संप्रेरकांतील बदलांमुळे उद्भवणारा ताण व शारीरिक वाढ, मित्रमंडळ व मित्रांकडून असणारा दबाव, शरीर प्रतिमा व लैंगिकता, शारीरिक आणि लैंगिक आकर्षण, माध्यमांच्या वापराचे असलेले व्यसन अशा कितीतरी गोष्टी आढळतात व त्यांवर योग्य वेळी योग्य सल्ला व मार्गदर्शन मुलांना मिळाले तर ती एक जबाबदार व उत्तम नागरिक बनू शकतात.

मुलांनी तारुण्यात पदार्पण केलं की जास्त करून त्यांच्या वयाच्या मुलांकडे त्यांचा ओढा असतो. मित्रमंडळ जास्त महत्त्वाचं! त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या आवडीनिवडी, प्रशंसा या सगळ्याचा गुंता. मग आईवडिलांशी बोलायला वेळ नसतो. तसेच मुलं तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वतःला स्वयंपूर्ण बनवायला बघतात व त्यामुळे ते आपलं अस्तित्व घडवण्यासाठी धडपडत असतात. आईवडिलांना या गोष्टीची जाणीव असायला हवी पण कित्येकदा त्यांना या गोष्टीचा मागमूसही नसतो.
तरीपण कितीही स्वातंत्र्य असलं तरीही या मुलांना आईवडिलांशी संवाद असणे महत्त्वाचे. निदान जेव्हा मुलांसमोर काही समस्या असते किंवा प्रश्‍नचिन्ह असते अथवा कुणाशीतरी बोलावं असं वाटत असतं तेव्हा आईवडिलांनी समजून ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
असे खूप मुद्दे आहेत जे आईवडिलांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे… ज्यामुळे मुले व त्यांच्यामधील सुसंवादामध्ये अडथळा येणार नाही व दोघांमध्ये चांगला संवाद राहील…

  • ऐकत रहा – हे सगळ्यात महत्त्वाचे. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्याशी बोलतात तेव्हा सगळे काम बाजूला करून- जसे मोबाइल, टीव्ही, घरकाम, इ. सोडून बसा व फक्त मुलांचं ऐका. ऐकायला पैसे पडत नाहीत, असे आपले पूर्वज म्हणायचे. त्यांची पूर्ण गोष्ट ऐकून घ्या. आपली मतं मांडू नका. असं समजू नका की त्यांचं ऐकलं म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला तुमचा होकार आहे. खूप वेळा या मुलांना कुणाशीतरी बोलायचे असते. त्यांना फक्त एक श्रोता हवा असतो. आता आपण ऐकतो म्हणजे त्यांच्यावर आपलं पूर्ण लक्ष असायला हवं. जर ऐकलं नाही तर परत विचारा. म्हणजे तुम्हाला तो काय म्हणतोय ते कळेल व खात्री होईल. प्रश्‍नाला प्रतिप्रश्‍न करू नका किंवा काही आवडलं तरी किंवा त्याची चूक आहे असे निदर्शनास आले तरी त्याच्यावर ओरडणे, आरोप करणे टाळायला पाहिजे. तो आपल्याला कुठलीही समस्या सांगत असेल तर आपण त्याच्यावर टीका किंवा निवाडा द्यायचा नाही. ऐकून घेणे महत्त्वाचे. मग आपण आपल्या सह्या व मत मांडायचे. त्याला जर कुणाच्या वागण्याने वाईट वाटले असेल तर आपण त्याच्याशी सहमत होऊन आपल्यालापण वाईट वाटले हे दर्शवायचे. तुम्ही त्याच्याशी वाद घालत नाही तरीसुद्धा. त्याला प्रश्‍न विचारायचे असतील तर खुले प्रश्‍न विचारायचे.

जेव्हाही तुम्ही आपल्या किशोरवयीन मुलांशी बोलता तेव्हा त्यांनी काय करायचे हे स्पष्टपणे मांडा. आपण नेहमी मुलांना काय करायचे नाही ते सांगतो. पण काय करायचे हा मुद्दा तिथेच राहतो.

  • जेव्हा वातावरण गरम असते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी अजिबात वाद घालू नका. किशोरवयीन मुले जेव्हा रागावतात व मोठ्याने बोलतात तेव्हा साहजिकच आईवडील पण स्वतःवरील नियंत्रण सोडून त्यांच्यावर चिडतात व ओरडतात. हे असे होता कामा नये. मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ही मुलं दुसर्‍या वेळेस कुठलीही समस्या असेल तर दूर राहणार व आईवडिलांशी बोलायचे टाळणार, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण माघार घेतली तर त्यात आपली हार नसते. आपण फक्त सांगायचे की आपल्याला थोडा वेळ हवा व मग आपण परत या विषयावर बोलू. विषय हाताबाहेर जाण्याअगोदर आपण तो तिथेच बंद करणे हे अतिउत्तम. ओरडणे, किंचाळणे, मारामारी, नावाने खडे फोडणे असले प्रकार किशोरवयीन मुलांना हाताळताना वर्ज्य आहेत. कधीतरी मग बाजारात जाताना, दूर वाहनातून जाताना किंवा बाहेर जेवायला जाताना संधी साधून आपण तो विषय हळूच काढायचा. त्याचप्रमाणे जर मुलगा स्वतःहून तुमच्याशी बोलायला आला तर त्याला – मला वेळ नाही, ही वेळ काय बोलायची आहे, पुढे कधीतरी बोलू… असं करू नका. आपली कामं बाजूला सारून एकदा त्याचे ऐका. किशोरवयीन मुलं तुमच्याजवळ मोकळी व्हायला थोडा वेळ लावतात. ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना दुसरीकडे वळवू नका.

आपल्या मुलाला जादूची झप्पी म्हणजे हग म्हणजे प्रेमाने स्पर्श करावा. सकाळी शाळेत जाताना, परीक्षेला जाताना, तो अपसेट असेल तेव्हा, किंवा त्याला गुडनाईट करताना असा स्पर्श करावा. या स्पशातून तुमचं प्रेम आणि काळजी त्याच्यापर्यंत पोहचते. तसेच प्रत्येक वेळेला त्याच्या भावनांची कदर करा व तुमचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असल्याचे त्याला पटवून द्या. तसं असेल तर मुलं कुठल्याही परिस्थितीत तुमच्याकडे झेपावतील. तसेच मार्गातून भटकले तरी परत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतील.

काही काही आईवडील मुलांचे संगोपन ‘हिटलर’सारखे करतात. बस म्हटले की बसा, उठ म्हटले की उठा! किशोरवयीन मुलांना हे आवडत नाही. त्यामुळे ती प्रतिप्रश्‍न करतात व मग आईवडील व मुलांमध्ये सतत धुसपूस सुरू होते. ह्याउलट काही पालक संभाषणाची वाट उघडी ठेवतात. कुठलाही प्रश्‍न हाताळताना ते मुलाचा सल्ला घेतात; मार्गदर्शन करतात. हे आईवडील समजूतदार तसेच आदर्श असतात. जे शिकवणार ते आचरणात आणणार. त्यांमुळे त्यांचा मुलांशी चांगला संबंध टिकून राहतो. मुलं पण शांत, मेहनती, मिळून-मिसळून वागणारी व आयुष्यात चांगले नागरिक बनतात. ते आयुष्यात काहीतरी मोठं करतात किंवा मिळवतात.

तारीफ किंवा प्रशंसा कुणाला आवडत नाही? आणि आपल्या किशोर-किशोरींना तर याची खूपच गरज असते. त्यांना प्रशंसेची गरज असते आणि ह्यामुळे मित्रमंडळ हा त्यांचा केंद्रबिंदू असतो. त्या मित्रांमुळे त्यांना खूपच प्रोत्साहन मिळते. हेच जर आईवडील करू शकले तर मिळवलं. आपल्या मुलाला कुठल्याही कामासाठी मग ते छोटं असू दे की मोठं, आपण कौतुक करायचं. यामुळे त्यांना जास्तच प्रोत्साहन मिळते व ती आणखी चांगले काम करायला प्रोत्साहित होतात.

  • आता प्रत्येकाला ताण किंवा मानसिक तणाव खूप असतो. पण याचा अर्थ तो आपण दुसर्‍याशी वागताना दाखवू नये. आपल्या किशोरांच्या बाबतीत हे महत्त्वाचे आहे. अभ्यासाचा तणाव, मित्रांचा दबाव, शाळेचा व शिक्षकांचा दबाव, शारीरिक वाढ, शरीरात होणारे संप्रेरकांमधले बदल या सगळ्यातून तो बिचारा वाटचाल करत असतो. हे समजून घेणे आवश्यक. नाहीतर आईवडलांनी उगाच वाद सुरू करणे, आपल्या रागाला आवर न घालणे यामुळे त्यांच्या संबंधात दुरावा येतो. आपणच त्यांचे आदर्श बनून मुलांना आपल्या भावनांवर कसा आवर घालायचा हे शिकवणे महत्त्वाचे.
    शेवटी आपल्या मुलांना आणि त्यातही किशोरवयीनांना जास्तीत जास्त वेळ देणे हे महत्त्वाचे. तसेच फिरायला जाणे, पोहणे, जिममध्ये जाणे व सायकल चालवणे हे मुलांसोबत आपणही करू शकतो, ज्यामुळे मुलांशी आपला संबंध राहतो. काही बोलायचे असेल तर बाहेर कुठे जेवायला गेल्यावर किंवा कॅफेटेरियामध्ये किंवा समुद्रकिनारी फिरताना आपण कुठलाही विषय काढून त्यावर बोलू शकता. या वेळेला मुलं जास्त क्रियाशील असतात आणि त्यांचे लक्ष आपण वेधून घेऊ शकतो. जास्त लांबलचक भाषण न झाडता थोड्या आणि गोड शब्दात आपण त्यांच्याशी हितगुज केले तर जास्त चांगले.

शेवटी मुलांवर सतत तुम्ही बिनशर्त प्रेमाचा वर्षाव करा, कुठलीही गोष्ट अटी ठेवून केली की त्याला महत्त्व नसते. तसेच आपलं प्रेम त्यामध्ये दिसत नाही. ‘काहीही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे, कारण तू माझा मुलगा आहेस. तू कमी गुण आणलेस तरी मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करीन. मी तुझ्या पाठीशी आहे. तू काळजी करू नकोस. गरज पडली तर कधीही मला हाक दे…’ हे शब्द जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हाच या किशोराच्या काळजाला तुम्ही छेदून जाल. माझे पालक हेच बेस्ट आहेत.. असं त्यांना वाटलं पाहिजे.

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

पौर्णिमा केरकर ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून...