‘किरवंत’, ‘अंत्येष्ठी’ पारंपरिक व्यवसाय

0
101

समाज कल्याण खात्याच्या यादीत समावेश

समाज कल्याण खात्यातर्फे राबविण्यात यावयाच्या पारंपरिक व्यवसायांना संजिवनी देण्याच्या योजनेखालील व्यवसायांमध्ये सरकारने ‘किरवंत’ व ‘अंत्येष्ठी’ या दोन अतिरिक्त व्यवसायांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. नंदकुमार कामत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वरील योजना तयार करून ३६ पारंपरिक व्यवसायांची निवड केली होती. समाजकल्याण खात्याने या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देऊन ती अंतिम सोपस्कारांसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठविली आहे.

ब्राह्मण समाजात मृतांवर अंतिम संस्कार करणार्‍यांना ‘किरवंत’ म्हणून संबोधले जाते. सदर व्यवसाय करणार्‍यांची आर्थिक स्थिती बिकट आहे. तसेच मृतांवर अंत्यसंस्कार करणारे लोक मिळणे कठीण असून ‘अंत्येष्ठी’ व्यवसायालाही आधार देण्याचे सरकारने ठरविले आहे.