किरण बेदींकडे दोन मतदार ओळखपत्रे?

0
103

निवडणूक आयोगाकडून चौकशी
दिल्ली विधानसभेत निवडणुकीतील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे असल्याचे आढळून आल्याने आता ऐन धामधुमीत नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार या संदर्भात निवडणूक आयोगाने माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे. दोन वेगवेगळ्या पत्त्यांनुसार बेदी यांच्याकडे ही मतदार ओळखपत्रे असल्याचे स्पष्ट झाले असल्याने त्यापैकी एखादे ओळखपत्र त्यांनी रद्द केले आहे की काय याचाही शोध घेतला जात आहे.
सध्या निवडणूक प्रचार जोरात असून विरोधक या विषयाचा मुद्दा बनविण्याची शक्यता आहे.