किनाऱ्यांवरील बेकायदा 161 शॅक्सवर कारवाई सुरू

0
9

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता कळंगुट, कांदोळी येथील समुद्रकिनाऱ्यांवर चालू केलेल्या 161 शॅक्सवर कारवाई सुरू करून ते बंद करण्याच्या कामाला कालपासून सुरुवात करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या 28 मार्चला गोवा प्रदूषण नियत्रंण मंडळाची मान्यता नसलेले शॅक्स बंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर गोवा प्रदूषण मंडळाने तसा आदेश जारी केलेला असून, गोवा पर्यटन खाते, जिल्हा प्रशासन, पोलीस यांची संयुक्त आठ पथके शॅक्स सीलबंद करण्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांनी किनारी भागाला भेट देऊन शॅक्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.