Home बातम्या काही विद्यार्थी अजूनही अकरावीत प्रवेशाविना

काही विद्यार्थी अजूनही अकरावीत प्रवेशाविना

0

उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश न मिळालेल्या मुलांच्या पालकांनी काल दक्षिण गोवा विभागीय शिक्षणाधिकारी रामकृष्ण सामंत यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. नंतर शिक्षणाधिकार्‍यांनी त्यांची भेट पणजीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या घडवून आणली.

काल सकाळी आनंद नाईक व वालेंतिना फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली २० पेक्षा अधिक पालकांनी विभागीय शिक्षणाधिकार्‍यांना घेराव घातला. या पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी शिक्षणाधिकार्‍यांकडे अर्ज भरले होते ामत्र त्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. सरकारने सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेशाचे दिलेले आश्‍वासन पाळले नसल्याचा पालकांचा आरोप होता. दरम्यान, सामंत यांनी चौगुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गांवकर यांच्याशी संपर्क साधला मात्र प्राचार्यांनी ७५ टक्क्यांखाली गुण पडलेल्यांना प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले.