काश्मीरात पुन्हा दहशतवादी हल्ला; ३ जवान शहीद

0
154

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी संरक्षण दलावर हल्ला केला. सीआरपीएफच्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले. या चकमकीदरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले.

दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी काझियाबादमध्ये गस्तीसाठी जात असलेल्या सीआरपीएफच्या एका पथकावर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सात जवान जखमी झाले असल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकार्‍यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.