या भागात २००७ पासून बेकायदेशीरपणे खाण व्यवसाय सुरू आहे. वरील प्रकरणी केपे व मडगाव पोलिसातही तक्रार सादर केल्याचे वेळीप यांनी सांगितले. गेले दोन दिवस कावरे-पिर्ला भागातील वातावरण तंग आहे.
बेकायदेशीर खनिज वाहतुकीस विरोध करणार्या नागरिकांची पोलीस सतावणूक करीत असल्याचा आरोप वेळीप यांनी केला. खाण परिसरातील आमदार या प्रश्नावर आवाज काढण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. २००७ साली जे लोक या व्यवसायात गुंतले होते तेच लोक आता बेकायदेशीर खनिज वाहतूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही निवेदन सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

