कालवी पुलाचे काम पुढील एका महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या सूत्रांनी दिली.
कालवी येथे बस दुर्घटना घडल्यानंतर म्हणजे दहा महिन्यांपूर्वी या कमान (आर्क) पद्धतीच्या पुलाचे काम सुरू झाले होते. सुमारे ५८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होताच प्राध्यान्यक्रमाने सरकारने वरील प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात आले.