Home बातम्या कारच्या धडकेने पादचारी ठार

कारच्या धडकेने पादचारी ठार

0

काल वेळ्ळी येथील दोन रस्त्यांच्या संगमावर मारुती कारने धडक दिल्याने आल्फोंसो टोनी फर्नांडिस (६५) हा पादचारी ठार झाला तर एन. डी. माझारेलो (३६) हा जखमी झाला. जखमीस मडगाव येथील हॉस्पिसियु हॉस्पिटलात दाखल केले आहे.

काल सकाळी १०.४५ वाजता ते दोघे चालत जात होते. त्यावेळी असोळणा येथून वेळ्ळीच्या दिशेने जीए ०२ झेड ७४९० क्रमांकाची मारुती कार घेऊन रेमेडिओ डिसिल्वा (आंबेली) जात होता. भरवेगाने निघालेल्या कारची धडक त्या दोघा पादचार्‍यांना बसली व दोघे जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलात नेत असता आल्फोंसो फर्नांडिस मरण पावला. पोलिसांनी कारचालक रेमेडिओ याला अटक केली आहे.